केवलराम काळेला विदर्भातून सर्वाधिक मताधिक्य
मेळघाट विधानसभेचा निकाल लागला विदर्भातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेले केवलराम काळे हे मुंबईहून परत येतात आज त्यांनी मेळघाटात आपल्या कर्तव्याची जाणीव दाखवत विविध समस्या ऐकून घेतल्या विशेषता मेळघाटात प्रामुख्याने अडचणीत येणारा प्रश्न तो म्हणजे विजेचा यानिमित्य केवलराम काळे यांनी सर्व वीजवितरणच्या मुख्याधिकाऱ्यांना बोलून त्यांना विजेच्या समस्या पार पाडाव्या अशा प्रकारच्या सूचना दिल्या.
विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी केवलराम काळे यांनी आपले धारणीमध्ये कार्यालयाच्या शुभारंभ करत हे नुसतं कार्यालय नसून मेळघाटातल्या प्रत्येक जनतेच्या सेवेसाठी सेवा संकुल अशा प्रकारचे सुतवाच केले. मेळघाटात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात विजेचा त्रास त्या ठिकाणच्या स्थानिक आदिवासी बांधवांना सहन करावा लागतो आज पहिल्याच दिवशी केवलराम काळे यांनी आपला सेवा दरबार धारणी या ठिकाणी आयोजित करत विविध समस्यांना लगेच सोडवण्यास प्राधान्य दिले.
याशिवाय या ठिकाणी असणाऱ्या विविध शासकीय कर्मचाऱ्यांना बोलून स्थानिक आदिवासी बांधवांना कोणत्याही प्रकारच्या कामास दिरंगाई न करण्याच्या सूचना केल्या असून एकीकडे भरपूर ठिकाणी नवीन आमदार महोदयासाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्यामुळे आमदार केवलराम काळे यांनी सर्वप्रथम आदिवासी बांधवांच्या समस्येला न्याय देण्याचा प्रयत्न केला.